बाहुबली प्रभासचं इन्स्टाग्रामवर दमदार पदार्पण ; ‘या’ पहिल्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली फेम प्रभास याने नुकतंच सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. अ‍ॅक्टर प्रभास असं त्याने आपल्या इन्स्टा अकाऊंटला नाव दिलं आहे. प्रभासने नुसते अकाऊंट उघडले, एकही पोस्ट नसताना लाखो चाहत्यांनी त्याला फॉलो केले. यानंतर आता अखेर प्रभासने त्याचा पहिला फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. त्याच्यावर अक्षरश: लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

प्रभास हा फोटो त्याच्या बाहुबली या सिनेमातील आहे. क्षणातच हा फोटो बाहुबली या सिनेमाची आठवण करून देतो. हातात दोन तलवार पकडलेला असा त्याचा फोटो आहे. पोस्ट केल्याच्या काही वेळातच हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला आहे. सोबतच प्रभासचं इन्स्टाग्रामवर डेब्यू करणंही लोकांना भावलं आहे.

 

प्रभासने पोस्ट केलेला त्याचा पहिला फोटो आणि त्याचे इन्स्टावरील प्रोफाईल पिक्चर सारखेच आहे. हा फोटो शेअर करताना त्याने फोटोला कुठेलही कॅप्शन दिलेले दिसत नाही. प्रभासचा फोटो पोस्ट केल्याच्या काही वेळात प्रचंड व्हायरल झाला. त्याच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने फोटो लाईक करत त्याच्यावर अक्षरश: लाईक्सचा पाऊस पाडला. 14 एप्रिलला इन्स्टाग्राम सुरु करणाऱ्या प्रभासचे जवळपास 9 लाख फॉलोवर्स झाले आहेत. प्रभासने अजून एकाही व्यक्तीला फॉलो केलेले नाही हे विशेष. सध्या प्रभास त्याचा आगामी सिनेमा साहोच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.