बालाजी टेलीफिल्मच्या स्टाफला NCB ने 70 ग्रॅम MD सह केली अटक

मुंबई : बॉलीवुडच्या ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अटकसत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बालाजी टेलीफिल्मचा स्टाफ (एडिटिंग डिपार्टमेंट) प्रदीप साहनी यास 70 ग्रॅम एमडीसह अटक केली. नुकतेच मुंबई क्राइम ब्रँचने उस्मान अली शेख नावाच्या एका ड्रग पॅडलरला अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

उस्मान शेख डिलिव्हरी बॉय बणून ड्रग्ज सप्लाय करत होता. तो पश्चिम उपनगरात जास्त सक्रिय होता, जेथे अनेक टीव्ही आणि चित्रपट कलाकारांचे राहाण्याचे ठिकाण आहे. यामुळे त्याच्या क्लायंट लिस्टची चौकशी केली जात आहे.

सुशांस सिंह प्रकरणात ड्रग कनेक्शनचे धागेदोरे जुळवल्यानंतर बॉलीवुडचे अनेक प्रसिद्ध चेहरे एनसीबीच्या रडारवर आहेत. नुकतेच अभिनेत्री दिपिका पदुकोणची चौकशी करण्यात आली होती.

26 सप्टेंबरला दीपिकाची साडेपाच तास चौकशी करण्यात आली, यात सुशांत सिह राजपूत किंवा रियाशी संबंधित कोणताही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. एनसीबीचा संपूर्ण फोकस दीपिकाच्या करिष्मासोबतच्या त्या चॅटवर होता, ज्यामध्ये ते ड्रग्जबाबत बोलत होते.

डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा कोरोना संक्रमित
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) चे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा कोरोना संक्रमित झाले आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी केपीएम मल्होत्रा दिल्लीला परतले. एनसीबीच्या एसआयटी टीमला केपीएस मल्होत्राच लीड करत आहेत.