Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरूवात

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) आर्थिक मागास प्रवर्ग आणि अल्पउत्पन्न गटासाठी पीएमआरडीएच्या (PMRDA) माध्यमातून मोशी आणि वाल्हेकरवाडी येथे बांधण्यात येणार्‍या ७९३ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा आज शुभारंभ झाला. २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून पीएमआरडीएच्या वेबसाईटवर नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी (Bansi Gawli) यांनी दिली आहे.

 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) मोशी (Moshi) येथे आर्थिक मागास प्रवर्गासाठी वन बीएचकेच्या ३१ सदनिका उपलब्ध असून सदनिकेची किंमत ७ लाख ४० हजार आहे. तर टू बीएचकेच्या ७९३ सदनिका असून एका सदनिकेची किंमत ३२ लाख रुपये आहे. वाल्हेकरवाडी येथे वन रुम किचनच्या ३६६ सदनिका असून एकीची किंमत १८ लाख ८० हजार रुपये तर वन बीएचकेच्या ४१४ सदनिका असून एकीची किंमत २५ लाख ४७ हजार रुपये आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmrda.gov.in अथवा http://lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन गवळी (PMRDA Bansi Gawli) यांनी केले आहे.

 

 

Web Title : –  PMRDA invited online applications for 1604 flats under Pradhan Mantri Awas Yojana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा