Thane ACB Trap | 24 हजार रुपये लाच घेताना MMRDA चा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीचे झोन प्रमाणपत्र (Land Zone Certificate) देण्यासाठी 24 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) उप नियोजक (Deputy Planner) यांना रंगेहात पकडले. शिवराज पवार (Shivraj Pawar) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उप नियोजक अधिकाऱ्याचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.1) MMRDA च्या कार्यालयात सापळा रचून केली.

 

तक्रारदार यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मालकीची जमीन विकसित करण्यासाठी झोन प्रमाणपत्र मिळण्यासाठी MMRDA च्या कार्यालयात अर्ज केला होता. उप नियोजक शिवराज पवार यांनी झोन प्रमाणपत्र देण्यासाठी 15 हजारांची तसेच तक्रारदाराच्याच मित्राच्या मालकीच्या जमिनीच्या झोन प्रमाणपत्रासाठी 12 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Thane) तक्रार केली.

 

ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) बुधवारी (दि.30 ऑगस्ट) प्राप्त तक्रारीची पडताळणी केली.
यामध्ये उप नियोजक शिवराज पवार यांनी झोन प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येकी बारा हजारांप्रमाणे एकूण 24 हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीच्या ठाणे युनिटने गुरुवारी MMRDA च्या कार्यालयात सापळा लावून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पवार यांना रंगेहात पकडले.

 

Web Title :- Thane ACB Trap | acb caught red handed mmrda officer in thane in bribe case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

 

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

 

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या, महिन्याभरातील दुसरी घटना