मोदी सरकारची पहिली मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये ‘पेन्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत जवळपास १२ ते १३ कोटी शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. सरकार पहिल्या टप्यात ५ कोटी शेतकऱ्यापर्यंत पोहचेल.. जर लाभकारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५०% रक्कम मिळेल. या योजनेवर १० हजार कोटी खर्च केले जातील. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती दिली. नव्याने स्थापन झालेल्या मोदी सरकारच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी सन्मान निधी अंतर्गत दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार तीन टप्यात ६००० रुपये वार्षिक देणार आहे. आता ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शेतकऱ्याला पेन्शन देऊन बळ दिले जाईल.

काय आहे ही योजना ?
पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेनुसार आता ६० व्या वर्षात शेतकऱ्यांना ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेअंतर्गत १२ कोटी शेतकरी येत आहेत. पहिल्या टप्यात ५ कोटी शेतकरी येतील. १८ ते ४० वर्षांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या वयोगटातील शेतकऱ्यांना ६० वर्ष पूर्ण केल्यानंतर ३००० रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये १८ वर्षाच्या शेतकऱ्यांना ५५ रुपये मासिक रुपये बँकेत जमा करावे लागतील.