‘पंतप्रधान किसान’ योजनेचे पैसे मिळत नसतील तर ‘हे’ करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पैसा शेतकऱ्यांना मिळत नसेल तर आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. यासाठी आता थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येणार आहे. ही योजना मोदी सरकारची शेतकऱ्यांशी संबंधित असणारी सर्वात मोठी योजना आहे. प्रत्येक खऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

देशातील ३.९४ कोटी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेच्या दोन टप्यातील पैसा पोहचला आहे. जर तुम्ही त्यामध्ये नसाल तर पहिल्यांदा तुम्ही महसूल अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हवा. जर त्या ठिकाणीही तुमच्या समस्येचे निवारण होत नसेल तर पंतप्रधान शेतकरी मदत डेस्कच्या इमेलवर ([email protected]) संपर्क करावा. इमेलवरही प्रतिसाद मिळत नसेल तर फोन नंबर ०११ – २३३८१०९२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेतील पैसा मिळत नाही. एकीकडे एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन वेळेस दोन दोन हजार रुपये आले आहेत तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्यातील पैसे देखील मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्यातील पैसे आले असून दुसऱ्या टप्यातील पैसे अजून आले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी महसूल किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासून पहावे.

जर नाव असेल तर त्यांना विचारा की त्यांच्या खात्यात अद्याप पैसे का आले नाहीत. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. सरकार देशातील सर्व १४.५ कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निश्चय केला आहे.

या योजनेच्या वेल्फेअर सेक्शनमध्ये देखील संपर्क केला जाऊ शकतो. दिल्लीतील याचा फोन नंबर आहे ०११ – २३३८२४०१ तर इमेल आयडी आहे. ([email protected])

सिने जगत –

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’