Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकर म्हणाले – ‘आमच्याकडे कोणीही…’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (Andheri East By-Election) शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची आहे. मात्र शिंदे गट-भाजप युतीकडून (Shinde Group-BJP Alliance) भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  बोलत होते. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे.

 

वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले की, युती-आघाडीमध्ये कुठल्या एका पक्षाला जागा सुटते. त्यानंतर कायम त्याच पक्षाच्या उमेदवाराचा तिथे दावा असतो. त्यामुळे उमेदवार नसलेल्या पक्षाचे कार्यकर्ते टिकत नाहीत. परिणामी पक्ष संपतो. ही बाब आता प्रत्येक पक्षाने लक्षातही घेतली आहे. स्वतंत्र निवडणुका लढविल्या तरच पक्ष टिकतील.

 

प्रकाश आंबेडकर हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी ते यवतमाळ येथे आले होते. येथे त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि निवडणुकीसंदर्भात त्यांनी चर्चा केली.

आंबेडकर म्हणाले, 80 टक्के बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागत करू.
युती-आघाडीने पक्षांचे नुकसान होत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
काही मतदारसंघात पूर्णपणे पक्ष संपलेला असल्याचे पक्षांना दिसले. लोकशाहीला टिकविण्यासाठी राजकीय पक्षांची गरज आहे.

 

आंबेडकर म्हणाले, राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले तरच टिकतील. युतीमध्ये वारंवार एकाच पक्षाला जागा सुटते,
त्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते टिकत नाही.
तसेच बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करावी, हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी होत असेल तर त्या मालाची खरेदी बाजार समितीने करावी,
त्यासाठी रिझर्व फंड वापरण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे डॉ. निरज वाघमारे,
जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, मोहन राठोड, विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे,
धनंजय गायकवाड, शहराध्यक्ष अध्यक्ष कुंदन नगराळे, आकाश वाणी, शिवदास कांबळे उपस्थित होते.

 

Web Title :-  Prakash Ambedkar | maharashtra political crisis mumbai andheri east vidhansabha bypoll prakash ambedkar neutral in rutuja latke shivsena vs muraji patel bjp fight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | हे दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ आहेत का? – सुषमा अंधारेंचा मोठा प्रश्न

 Amit Thackeray | अमित ठाकरे देखील ठेवणार आदित्य यांच्या पावलावर पाऊल, महाराष्ट्र दौर्‍यावर असताना दिले संकेत

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा