विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’चा ‘हा’ आहे ‘मास्टर प्लॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक जागा जिंकली असली तरी मतविभाजन झाल्याने अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केल्याने सर्वात जास्त तोटा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वंचितला सोबत घेण्याच्या तयारीत असताना वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यंच्या या निर्णयामुळे राज्यातच नाही तर देशात देखील निकालाचे चित्र बलणार आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची रणनितीची माहिती दिली. वर्षाच्या शेवटी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मेगा प्लॅन आखला आहे.

विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे. राज्यात सध्या पाणी टंचाई असून हाच मुद्दा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये वंचितचे व्हिजन मतदारांना सांगून त्यांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन करणार आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीचा देशभर विस्तार करणार असल्याचे आंबेडकर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवली. या निडणुकीत वंचित आघाडीला १४ टक्के मते मिळाली. हे वंचितसाठी मोठे यश असल्याचे सांगितले. केवळ विजय मिळवणे हा एकमेव हेतू नाही. आम्ही वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिने जगत –

ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !