Prakash Ambedkar On Bjp And RSS Agenda | निवडणुकीसाठी मुस्लीम-दलितांचा नरसंहार करू शकतात भाजपा-आरएसएस, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Prakash Ambedkar On Bjp And RSS Agenda | निवडणुकीच्या तोंडावर देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास भाजपा-आरएसएस मागेपुढे पाहणार नाहीत, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. (Prakash Ambedkar On Bjp And RSS Agenda)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह सर्व विरोधी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय गांभिर्याने घेतले जात आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेबाबत सुद्धा आंबेडकर यांनी चिंता व्यक्त करणारे मोठे वक्तव्य केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजपा- आरएसएसचा इतिहास पाहता हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपरिक अजेंडा असल्याचे दिसते. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलींप्रमाणे – भारतातील लोकशाहीची आणि देशातील मुस्लीम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते (भाजपा-आरएसएस) मागेपुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता वाटते.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यामुळेच अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या
उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी.
तसेच राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीकडे सोपवावी, अशी गांभीर्यपूर्वक मागणी मी करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ram Satpute | आमदार राम सातपुते यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; “उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची प्रवृत्तीच…”