Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट; लढ्यासाठी दिला पाठिंबा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Prakash Ambedkar | मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. जालना येथे पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर सत्ताधारी महायुती सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे उपोषणाला बसले असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. आज (दि.05) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना धीर देत या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला (Maratha Reservation Protest) पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर प्रकृतीकडे देखील लक्ष देण्याचे आवाहन उपोषणकर्त्यांना केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांचे मनोबल वाढवले असून त्यांना लढा असाच सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की,“मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. असा लढा एक दिवसाचा नसतो, हे आपण महात्मा गांधींपासून पाहत आलो आहे. स्वातंत्र्याचा लढाही अनेक दिवस चालला. ब्रिटनमध्ये जोपर्यंत ‘चर्चिल’ सत्तेत राहतील तोपर्यंत भारताला स्वातंत्र मिळणार नाही, असं इंग्लंडमध्ये सांगितलं जात होतं. त्यानंतर चर्चिल हरले, आणि सत्तेत ‘अॅटली’ आले. सत्तेत आल्यानंतर अॅटलींनी सांगितलं, आम्ही भारताला स्वातंत्र देऊ आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं.”

ते पुढे म्हणाले की, “आपल्यालाही अशीच वाटचाल करावी लागेल. येथील व्यवस्थेला आणि न्यायालयालाही तुम्ही अंगावर घ्यायला शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येथील व्यवस्थेला आणि न्यायालयाला अंगावर घ्याल, त्यादिवशी तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढत आहात, तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं.” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयीन बाजू देखील नमूद केली आहे.
ते म्हणाले की, “राज्यघटनेमध्ये असे कुठेही नमूद केलेले नाही की, अमूक समाजाला आरक्षण देता येणार नाही.
कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की, एखाद्या समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही, असं म्हटलं नाही.
पण आरक्षण देताना संबंधित वर्गाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? हे सरकारने सिद्ध करावं.
शासनाने तसं सिद्ध केलं, तर त्यांना आरक्षण देण्यात आमचा कुठेही हस्तक्षेप नसेल.” असे मत प्रकाश आंबेडकर
(Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले आहे. सरकारने लवकरात लवकर जीआर काढला नाही तर पाणी पिणे
देखील सोडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला (State Government) दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

Maratha Reservation | थोडी सबुरी ठेवावी लागले, सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल