Prakash Ambedkar | … तर शिंदे गटाला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी ठेवली अट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक भेट ही राजकीय असते असे नसते, असे त्यांनी म्हटले. तसेच भाजपसोबतच्या (BJP) पक्षांना पाठिंबा देणार नाही. मात्र शिंदे गटाने (Shinde Group) भाजपसोबतची युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करु असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंसोबत झालेल्या बैठकीचा खुलासा केला. प्रत्येक भेट ही राजयकीय नसते. इंदू मिलमधील (Indu Mill) स्मारक संदर्भात मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपसोबत आम्ही सध्या युती करणार नाही. भाजपसोबत असलेल्या पक्षांना पाठिंबा देखील देणार नाही. परंतु शिंदे गट भाजपसोबत असलेल्या युतीतून बाहेर पडला तर पाठिंबा देण्याचा विचार करु असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा खिमा केला असता

यावेळी बोलताना ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्यांनी भाष्य केलं. आम्ही तयार आहोत.
आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली युतीबाबतची भूमिका जाहीर करावी.
उद्धव ठाकरे यांनी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत जाहीर करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीने (NCP) आमचा खिमा केला. आम्ही भाजपसोबत गेलो असतो तर आम्ही काँग्रस, राष्ट्रवादीचा खिमा केला असता असेही त्यांनी म्हटले.

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkars press conference reaction on alliance with thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड अडीच तास चर्चा, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाला धक्का देणार?

Pune Crime News | वीजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Yerwada Jail Exhibition | कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची माहिती