Prakash Ambedkar-Shahu Maharaj Chhatrapati | कोल्हापुरात काँग्रेस उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांना वंचितचा पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

मुंबई : Prakash Ambedkar-Shahu Maharaj Chhatrapati | शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचे कुटुंबं चळवळीच्या जवळचे आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडले होते ते यावेळेस न घडू देणे याची दक्षतासुद्धा घेण्यात येईल. शाहू महाराजांना काँग्रेसने (Congress) उमेदवारी दिली आहे (Kolhapur Lok Sabha). त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी मोठी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.(Prakash Ambedkar-Shahu Maharaj Chhatrapati)

प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर म्हटले की, महाविकास आघाडीचे विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही.

आंबेडकर म्हणाले, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्षा रजिस्टर केला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली आहे. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचेच घोंगड भिजत पडलेले आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही. किंवा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणत्या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली. पुढे चर्चा सुरु राहणार आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, १० जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांचा दावा आहे. ५ जागांवर राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस असा वाद आहे. तुम्ही आम्हाला प्राधान्य दिले असते तिढा राहिला नसता. त्यांचेच भांडण मिटत नसेल तर आम्ही त्यामध्ये कुठे शिरायचे? त्यांच्यात आजही तिढा सुटला आहे, असे सांगण्यात आलेले नाही.

प्रकाश आंबेडर म्हणाले, आम्ही २६ तारखेपर्यंत थांबणार. त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार.
आम्ही एक भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्ष ज्या सात जागा जिंकू शकतात, त्या जागा त्यांनी आम्हाला कळवाव्यात.
आम्ही कुठे थांबलेलो नाहीत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे दिल्लीतील नेते रमेश चेन्नीथला,
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील त्या सात जागांवर एकमत झाले तर चांगले आहे.
नाही झाले तर खर्गेंनी येऊन आम्हाला कळवावे, असे आम्ही त्यांना सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Lok Sabha | ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’ ! मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार (Video)