Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा (Karnataka CM) निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केली. कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना ‘किरकोळ’ आहे असे वक्तव्य भाजप नेते (BJP leader) व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केले होते. याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले.

 

 

अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील (Jangali Maharaj Road) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले.

 

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला ‘किरकोळ’ वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील (Maharashtra) अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही, असे जगताप यांनी म्हटले.

 

 

नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे,
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत.
यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते.
आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता,
परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.

 

 

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख,
रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil), राकेश कामठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख,
मनाली भिल्लारे, महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title :- Prashant Jagtap | party affiliation is more important to Devendra Fadnavis than the honor of Chhatrapati Shivaji Maharaj; Criticism of NCP Prashant Jagtap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव

RTE Admission | आरटीई प्रवेशाच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त, पुण्यात 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या तरूणीचा प्रियकराकडून ‘पॉश’ हॉटेलमध्ये खून, हत्येचं कारण आलं समोर; आत्महत्या केल्याचा बनाव उघड