Pravin Darekar | NCP वर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’ (व्हिडीओ)

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सचिन धुमाळ) – शिरूर येथील आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले,

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (lavni samradni surekha punekar) आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे (shantabai fame sanjay londhe) यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांनी पुण्यातील शिरुरमध्ये (Shirur, Pune) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे (Jai Malhar Kranti Sanghatana) आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीब माणसांकडे बघायला वेळ नाही.
कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे’
अशा शब्दांत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
यांची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशवर जीभ घसरली आहे.
आता या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापणारे हे मात्र खरे.

Web Titel :- Pravin Darekar | Criticizing the NCP, Praveen Darekar lost his temper and said, “NCP is a party that kisses the cheeks” (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government | महाराष्ट्र शासनाच्या 29 विभागांमध्ये तब्बल दोन लाख 193 जागा रिक्त

Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांना 2,18,200 रुपये देईल मोदी सरकार, ऑक्टोबरमध्ये अकाऊंटमध्ये येऊ शकतात पैसे, जाणून घ्या