Pravin Darekar On Sanjay Raut | संजय राऊतांचा आरोप भाजपाच्या जिव्हारी, फडणवीसांसाठी प्रवीण दरेकर आले पुढे, हा मूर्खपणाचा कळस, 4 जूननंतर थोबाड फुटंल

मुंबई : Pravin Darekar On Sanjay Raut | सामनाच्या दाव्याला काडीची किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातले वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. राज्यभर व्यस्त असताना गडकरींच्या भक्कम विजयासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले योगदान नागपूरवासियांना माहीत आहे. त्यांची दुटप्पी भूमिका आहे. ४ जूननंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं दिसेल, अशी टिका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

४ जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदारातून केला आहे. यावर दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.

प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करावी, हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल. ४ जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेले आपल्याला दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे मोदी-योगी असे चित्र उभे करू नका.

संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी करा.
हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे.
संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून,
काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका दरेकर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…