पुण्याचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रवीण गायकवाड यांची पोलीसनामाला सदिच्छा भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभेचे पुण्यातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रवीण गायकवाड यांनी शुक्रवारी पोलीसनामाच्या कार्य़ालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी यशोधन ७ न्युज मीडियाचे आनंद गिल्डा यांनी त्यांचे स्वागत केले. प्रवीण गायकवाड यांनी पोलीसनामाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले प्रवीण गायकवाड यांनी पोलीसनामाच्या कार्यालयास भेट देऊन पुण्यातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी पोलीसनामाची टीम उपस्थित होती. त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि  त्यांच्या बाबतीत घडलेले काही किस्से सांगितले.

प्रवीण गायकवाड यांनी काही राजकीय पुढाऱ्यांबरोबरचे विनोदी किस्से सांगितले. तर काही वेळा कशा प्रकारे आपले म्हणणे पटवून दिले हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आपल्या साध्या पणामुळे आणि जनतेची केलेली कामे यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्यावर विश्वास टाकला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिला दिनानीमीत्त पोलीसनामामधील महिला प्रतिनिधींना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.