Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao | पुण्यात उभारला ‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा कटआऊट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao | सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ (Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao) या महाराष्ट्राच्या महासिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातील हितचिंतक, चाहते आणि रसिक प्रेक्षक विविध प्रकारे शुभेच्छा देत आहेत. पुण्यामध्ये माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक माधवराव मानकर (Deepak Madhavrao Mankar) तसेच करण मानकर, दत्ता सागरे (Datta Sagre) आणि आनंद सागरे (Anand Sagre)यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ (Shrimant Dagadusheth Halwai Temple) सरसेनापती हंबीरराव यांचा १८ फूट उंच कटआऊट उभा केला आहे.

 

File photo

त्यानिमित्त या मान्यवरांनी खूप मोठा स्वागत सोहळा आयोजित केला होता. खास काढलेली रांगोळी, सजावट आणि ढोलताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते सौजन्य निकम तसेच सूर्यकांत निकम, प्रताप निकम यांच्यासह पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) यांची प्रविण तरडे यांच्या रूपातील १८ फूटी छबी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा, प्रचंड ऊर्जा आणि चित्रपटाबद्दल उत्सुकता अशा भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या नेत्रदीपक सोहळ्याचा समारोप उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून करण्यात आला.

 

File photo

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Web Title : Cutout of ‘Sarsenapati Hambirrao’ set up in Puned

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त