निर्दयतेचा कळस ! गर्भवती महिलेचा खून करून पोटातून काढलं बाळ

शिकागो : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या शिकागोमध्ये एक मन सुन्न करणारा आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. मुलांच्या संगोपनासाठी लागणारे सामान दिलं जाणार असल्याचं सांगून एका घरात बोलवत महिलेचा खून केला. त्यानंतर तिच्या पोटातील बाळ बाहेर काढलं.

मार्लेना ओचाओ लोपेज हिचा २३ एप्रिल रोजी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय क्लारिसा फिग्युरोअ आणि तिची २४ वर्षीय मुलगी डेसीरीवर आरोप केले गेले आहेत. तर क्लारिसा फिग्यूरोअ हिचा प्रियकर पिओट बोबाकवर खून करून गुप्तता पाळल्याचा आरोप आहे.

मार्लेना ओचाओ लोपेजला २३ एप्रिल रोजी एका घरात मुलांच्या संगोपनाचं साहित्य दिलं जाणार असल्याचं सांगून बोलावण्यात आलं. दरम्यान त्याचवेळी तिला एका व्यक्तीने पाहिले होते. ४ तासांनंतर फिग्युरोने आपात्कालीन नंबरवर फोन करून एका महिलेने मुलाला जन्म दिल्याचा दावा केला. त्यानंतर मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी रात्री फिग्युरोच्या घराची झडती घेतली. तेव्हा मार्लेनाचा मृतदेह पोलिसांना सापडला. डिएनएम तपासल्यानंतर ते मुल मार्लेनाचं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान फिग्युरो आणि मार्लेना यांच्यातील ७ एप्रिल रोजी झालेल्या फेसबुकवरील संभाषणावरून काही बाबी हळूहळू स्पष्ट होत गेल्या. याप्रकरणी शिकागो पोलीस अधिक तपास करत आहेत.