‘डिलीव्हरी’ दरम्यान पती सोबत असेल तर कमी होतं पत्नीचं ‘लेबर पेन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक जोडपी तुम्ही अशी पाहिली असतील की, जेव्हा पत्नीच्या डिलीव्हरीची वेळ येते तेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना पतीही आत येण्यासाठी विचारणा करतो. अनेकदा यासाठी डॉक्टर नकार देतात तर कधी परवानगीही देतात. अनेकदा त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यावर प्रश्नही उपस्थित केले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, डिलीव्हरी रुममध्ये पत्नीसोबत पती आला तर पत्नीचं लेबर पेन कमी होतं. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

या संशोधनात 48 जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील निरीक्षणात दिसून आलं की, महिला त्यांचा पती सोबत असताना प्रसुतीच्या वेदना जास्त काळ सहन करत होत्या. असे दिसून आले की, जोडीदार सोबत उपस्थित असताना महिलेची सहनशक्ती वाढते. कारण प्रस्तीच्या वेळी त्या पतीसोबत बोलत होत्या. याशिवाय तो सोबत असल्याने त्याच्या स्पर्शानेही वेदना कमी झाल्याचे दिसून आले.

पतीने सोबत राहून स्पर्श केलाच पाहिजे आणि बोललंही पाहिजे असं काही नाही. पतीची फक्त उपस्थितीच पत्नीसाठी खूप आहे असेही यात दिसून आले आहे. पतीने जर पत्नीचा हात हातात घेतला तरी तिला खूप आधार वाटतो आणि तिच्या वेदना कमी होतात.

You might also like