तीन लाख रेशनकार्ड रद्द करण्यासाठी पीएमओचा अधिकाऱ्यांवर दबाव : केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान कार्यालयाने दिल्लीतील सुमारे ३ लाख रेशनकार्ड रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. यामुळे गोरगरिबांना अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ही माहिती केजरीवाल यांनी ट्वीटरवरून दिली असून यासोबत रेशन न मिळणाऱ्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’72281d3b-a6f5-11e8-996f-b937fdf82cf5′]

या व्हिडिओमध्ये हरजीत कौर म्हणते की, रेशन नसल्याने मुलांना उपाशी झोपावे लागते. रेशनवर धान्य मिळत नसल्याने अशाप्रकारचे हाल होत आहेत. हरजीत कौर ही दक्षिण दिल्लीतील सावित्री नगर गावात आपल्या कुटुंबासोबत मागील आठ वर्षांपासून राहात आहे. हरजीत म्हणते, मी अनेक महिन्यांपासून रेशनवरील धान्य आणत होते. कारण, मला खुल्या बाजारातील धान्य परवडतच नाही. परंतु, फिंगरप्रिट स्कॅनर प्रणाली आली आहे, मी माझ्या रेशनवरील धान्य आणू शकलेली नाही. आता अचानक केंद्र सरकारकडून एक नोटीस आली असून त्यामध्ये माझे रेशनकार्ड रद्द केल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली सरकारचा विरोध असतानाही पंतप्रधान कार्यालयाने अधिकऱ्यांवर दबाव आणून गोरगरिबांना अन्नधान्यापासून वंचित केले आहे. आता गरिब किती त्रस्त झाला हेच या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. पंतप्रधान कार्यालयाने असे करू नये.

केजरीवाल यांनी आरोप करण्यापूर्वी आपचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनीही यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका केली होती. दिल्लीतील रेशन वाटपात मोठा घोटाळा झाला असून यास केंद्र सरकार जबाबदार आहे.
[amazon_link asins=’B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76f499df-a6f5-11e8-85e6-2d436c411cd9′]

केजरीवाल आणि आयपीएस अधिकारी यांच्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला वाद याच विषयावरून झाला होता. यानंतर केजरीवाल यांनी उपराज्यपालांच्या निवास्थानातच उपोषण सुरू केले होते. अगोदर केजरीवाल यांनी मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मध्यरात्री मुख्यमंत्री निवास्थानी रेशन वितरणाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर मुख्य सचिवांनी मारहाण झाल्याचा आरोप केला होता. आणि प्रकरण केजरीवालांच्या उपोषणापर्यंत पोहोचले होते.