खुशखबर ! मोदी सरकारकडून WhatsApp सारखे App लवकरच ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलग दुसऱ्यांदा लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर मोदी सरकार नवनवीन योजना राबवून जनतेला उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मागील कार्यकाळात नमो अ‍ॅप तसेच भीम अ‍ॅप नंतर आता केंद्र सरकार व्हाट्सअ‍ॅप सारखे एक नवीन अ‍ॅप आणणार आहे. अमेरिकेने चिनी कंपनी हुवावेला हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली बॅन केल्यानंतर आता भारत सरकार देखील संपर्कासाठी नवीन अ‍ॅप बनवण्याच्या विचारात आहे. या अ‍ॅपमधील सर्व डेटा भारतातच स्टोअर केला जाईल. त्यामुळे हेरगिरीसारखे गुन्हे भारताच्या बाबतीत घडणार नाहीत.

माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारी यंत्रणांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक असे अ‍ॅप बनवण्याच्या विचारात आहे ज्यामध्ये ई-मेल आणि मॅसेज करण्याची सुविधा असेल. यामुळे सरकारी यंत्रणांचा डेटा देशातच सुरक्षित राहील. याविषयी विचार सुरु असल्याचे या विषयाशी निगडित एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी सरकार व्हाट्सअ‍ॅपच्या धर्तीवर नवीन अ‍ॅप बनवण्याचा विचार करत आहे. सुरुवातीला फक्त सरकारी उपयोगासाठीच या अ‍ॅपचा वापर करण्यात येईल मात्र त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी देखील हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात येईल.

अशा प्रकारे काम करते व्हाट्सअ‍ॅप

व्हाट्सअ‍ॅप हे एक मॅसेजिंग अ‍ॅप आहे. याद्वारे आपण फोटो, व्हिडीओ, व्हॉइस कॉल, व्हिडीओ कॉल यांसारख्या सुविधा वापरू शकतो. एंड-टू-एंड इंक्रिप्डेट या सुविधेद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. या अ‍ॅपमध्ये प्रत्येक मॅसेज एका कोडच्या रूपात पाठवण्यात येत असतो जो कोणीही डिकोड करू शकत नाही.

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश