हातात ‘रायफल’ घेऊन PM मोदींनी ‘डिफेन्स एक्सपो’ मध्ये लावला ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊ मध्ये सुरु झालेल्या डिफेंस एक्सपो मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीनतम शस्त्रांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी येथील शस्त्रांना पाहिले आणि वर्चुअल शूटिंग रेंजमध्ये त्यांनी निशाणा देखील लावला. एक्सपोमध्ये उपस्थित तज्ज्ञांनी पीएम मोदींना शस्त्रास्त्रांच्या बाबतीत माहिती देखील दिली, त्यानंतर येथे नरेंद्र मोदींनीही वर्चुअल शूटिंग रेंजमध्ये गोळीबार देखील केला.

वर्चुअल शूटिंग रेंज विज्ञानाची अशी करामत आहे जिथे आपण बुलेट्स वाया न घालवता निशाणा लावू शकतो आणि आपली क्षमता देखील तपासू शकतो. त्यामुळे हे प्रशिक्षण सैनिकांसाठी खूप महत्वाचे असते.

पंतप्रधानांच्या हातात रायफल
तज्ञांनी सांगितलं की पीएम जेथे उपस्थित होते तेथे वर्चुअल शूटिंग रेंज होते. वर्चुअल शूटिंग रेंज मध्ये निशाणेबाज किंवा सैनिक युद्ध न करता युद्धासारखा थरार अनुभवू शकतात आणि आपल्या युद्ध कौशल्याचे आकलन करू शकतात. या रोमांचकारी अनुभवात पीएम मोदींनी हातात एक रायफल घेतली आणि स्वत: निशाणा लावला.

संरक्षण क्षेत्रात भारताचे उड्डाण
त्याआधी संरक्षण एक्सपोला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की याचा मला अभिमान आहे की संरक्षण क्षेत्रात भारत देशी तंत्रज्ञान विकसित करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, आज इस्रो भारतासाठी, पूर्ण जगासाठी आऊटर स्पेस ची रहस्ये शोधत आहे, तसेच भारताचा डीआरडीओ या संपत्तीला चुकीच्या शक्तींपासून वाचवण्यासाठी संरक्षण भिंत बांधत आहेत.

भारत देश शांततेचा विश्वासू भागीदार
पीएम मोदींनी सांगितले की भारत देश आजपासून नाही तर कायमस्वरूपी विश्व शांतीच्या बाबतीत विश्वासू भागीदार राहिला आहे. तसेच ते म्हणाले की दोन महायुद्धात आपला थेट भाग नव्हता तरीही भारतातील लाखों सैनिक शहीद झाले होते. तसेच आज संपूर्ण जगामध्ये ६ हजाराहून अधिक भारतीय सैनिक संयुक्त राष्ट्र शांती सेवेचा भाग आहेत.

भारताची संरक्षणविषयी जबाबदारी आणि आव्हाने यावर चर्चा करताना पीएम मोदी म्हणाले की तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि दहशतवाद असो किंवा सायबर धोका असो, हे संपूर्ण जगासाठी मोठे आव्हान आहे. ते म्हणाले की नवीन सुरक्षा आव्हाने लक्षात घेता जगातील सर्व संरक्षण शक्ती नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. तसेच पंतप्रधान म्हणाले की आधुनिक शस्त्रांच्या विकासासाठी दोन प्रमुख गोष्टींची आवश्यकता आहेत त्या म्हणजे संरक्षण व संशोधनाची उच्च क्षमता आणि ते शस्त्र तयार करणे. गेल्या ५ – ६ वर्षात आमच्या सरकारने त्यास राष्ट्रीय धोरणाचा एक मुख्य भाग बनविले आहे.