‘भारत माता की जय’च्या घोषणेनं भारतीयांनी भूतानमध्ये केलं PM नरेंद्र मोदींचं स्वागत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात असताना नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मोदी.. मोदी.. अशा घोषणा ऐकायला येतात. मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी मोदींना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय नागरिकांनी भुतानमध्येच मोदी… मोदी.. अशा घोषणा दिल्या आहेत.

भूतानचा हा दुसरा अधिकृत दौरा आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भूतान या देशाची निवड केली होती. पंतप्रधान भूतानमध्ये पोहचताच तेथील सैन्य दलाने त्यांचे संचलन करत आदराने स्वागत केले.

त्यानंतर पंतप्रधानांना नरेंद्र मोदी थांबलेल्या ताज ताशी नामक हॉटेलमध्ये भारतीय नागरिकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी भारतीय नागरिकांनी मोदी.. मोदी.. अशा जोरदार घोषणा दिल्या, तर भारत माता की जय असा असा जयघोष सुद्धा यावेळी पहायला मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like