डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्या : अशोक बनकर

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशोत्सव मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी. डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. सामाजिक बांधीलकी मानून हा सण साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी तासगाव येथे केले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3b1cd7a-b2c0-11e8-9169-a7006bdb11ab’]

उपविभागीय कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी बनकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तासगाव, पलूस, कुंडल व भिलवडीमधील काही आदर्श मंडळांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. बनकर म्हणाले, डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा झाला तर पारंपारिक कलांचे जतन होईल. लोककला सादर करणा‍ऱ्या कलाकारांना काम मिळेल. ध्वनी प्रदूषणाला आळा बसेल. तसेच शाडूच्या मूर्ती घेतल्यास नद्या प्रदूषित होणार नाहीत. गेल्या वर्षी अनेक मंडळांनी जलयुक्त शिवार योजनेला निधी दिला. यावर्षी केरळमधील पूरग्रस्तांना आपण मदत करुया, असे आवाहन बनकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गणेश मंडळांना केले.

पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, कुंडलच्या सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील उपस्थित होते

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात