पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारताच्या स्वातंत्र्याच्या (India Independence Day) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) घेतला होता. चांगली वर्तवणूक व इतर निकषांनुसार निर्णय घेण्यात आला. प्रजासत्ताक दिनी (Republic Day) महाराष्ट्रातील 189 बंद्यांना विशेष माफी (Prisoners Release) देऊन त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.
केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष (Prisoners Release) ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central Jail) १२, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह (Aurangabad Central Jail) ११, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह (Kolhapur Central Jail) ७, मुंबई मध्यवर्ती कारागृह (Mumbai Central Jail) ४, नागपूर मध्यवर्ती कारागृह (Nagpur Central Jail) ३५, नाशिक मध्यवर्ती कारागृह (Nashik Central Jail) ३५, तळोजा मध्यवर्ती कारागृह (Taloja Central Jail) १६, ठाणे मध्यवर्ती कारागृह (Thane Central Jail) ११, येरवडा मध्यवर्ती कारागृह (Yerawada Central Jail) २०, अकोला जिल्हा कारागृहातील (Akola District Jail) ३, भंडारा ३, चंद्रपूर २, कोल्हापूर २, सिंधुदूर्ग ४, वर्धा २, वाशिम १, यवतमाळ जिल्हा कारागृहातील (Yavatmal District Jail) १, औरगांबाद खुल्या कारागृहातील (Aurangabad Open Jail) १३, पैठण खुले कारागृह ४, येरवडा खुले कारागृह १, येरवडा महिला कारागृतील २ असे एकूण १८९ बंद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
या कैद्यांना मिळाली माफी
यासाठी संबंधित कैद्याचे कारागृहातील वर्तन चांगले असणे गरजेचे आहे. ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे, ज्यांनी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.70 टक्क्यांपेक्षा अधिक शारीरिक दृष्ट्या दिव्यांग कैद्यांनी निम्मी शिक्षा भोगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बंदी, ज्या कैद्यांचा शिक्षेचा कालावधी संपलेला आहे. मात्र ज्यांना न्यायालयाने दिलेल्या दंडाची रक्कम भरता आली नाही, अशा कद्यांना विशेष माफी (Special Apology) दिली जाणार आहे.
तसेच ज्या कैद्यांनी 18 चे 21 वर्षाच्या वयोगटात अपराध केला परंतु त्यानंतर कोणता
अपराध न करता 50 टक्के शिक्षा भोगलेली आहे,
अशा कैद्यांचा विशेष माफी कैद्यात समावेश करण्यात आला आहे.
गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष माफी अंतर्गत सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांना समाजात पुर्नवसन करण्यासाठी
मार्गदर्शन सत्राचे देखील आयोजन केले जाणार आहे.
Web Title :- Prisoners Release | Release of 189 prisoners in the state on the occasion of Amrit Mahotsav of Independence
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…