धक्कादायक ! आग्रामध्ये 34 प्रवाशांची बस ‘हायजॅक’

पोलिसनामा ऑनलाईन – आग्रामध्ये फायनान्स कंपनीच्या नावाने बसलेल्या आरोपींनी 34 जणांची बस हायजॅक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जाणारी खासगी बस हायजॅक करण्यात आली आहे. चालक आणि कंडक्टरला बसमधून उतरून बस अज्ञात स्थळी नेण्यात आली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

मालपुरा भागात या खासगी बसचे अपहरण करण्यात आले. या बसमध्ये 34 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनचालक व कंडक्टरने माहिती दिल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सर्व उच्च अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. मात्र, बसविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात आरोपी फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले.

चालक व कंडक्टर यांना बसमधून उतरवून त्यांनी बस अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची माहिती आहे. चालक आणि कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 4 जण कर्मचारी असल्याचे सांगून बसमध्ये घुसले.प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण केल्या प्रकरणी खासगी बसचा चालक आणि पोलीस श्रीराम फायनान्स कंपनीचे नाव घेत आहेत. या फायनान्स कंपनीचे लोक जायलो एसयूव्ही गाडीतून आले आणि त्यांनी बस ताब्यात घेतली, अशी माहिती आहे. बस अपहरण करणार्‍यांनी चालक व कंडक्टरला ढाब्यावर जेवण दिले सोबत 300 रुपयेही दिले. मात्र, बस सध्या कुठे आहे, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे.