#MeToo : खटला लढणार; एम. जे. अकबर यांना पत्रकार प्रिया रमाणीचे प्रतिआव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मी टू या सोशल मीडियावरील महिलांच्या मोहिमअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांनी राजीनामा देण्याऐवजी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात त्यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांनी कोर्टात धाव घेतल्याच्या काही क्षणातच पत्रकार प्रिया रमाणी यांनी हा खटला लढण्याचे जाहिर करून प्रतिआव्हान दिले आहे. आपण कोर्टाची लढाई लढण्यास तयार आहोत, असे ट्वीट प्रिया रमाणी यांनी केले आहे. करंजवाला अँड कंपनी ही लॉ फर्म कोर्टात अकबर यांचा खटला लढणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9c9b465-d104-11e8-8df1-81c6bb0464b1′]

पत्रकार प्रिया रमाणी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा खटला लढण्यास मी तयार आहे. सत्य हाच माझा बचाव आहे. अकबर यांनी तक्रारकत्र्यां महिलांचे दु:ख आणि भय याकडे अजिबात लक्ष दिले नाही. अनेक महिलांनी केलेले तपशीलवार आरोप एका केंद्रीय मंत्र्यांनी राजकीय कट म्हणून फेटाळून लावल्याचे पाहून मी निराश झाली आहे, असे ट्वीट रमाणी यांनी केले आहे.

मौन बाळगत एम. जे. अकबर यांची पाठराखण भाजप नेतृत्व करत असल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. मात्र, अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातही जोर धरू लागल्याने भाजपच्या प्रवक्त्यांना यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अकबर यांच्याविरुद्ध काही महिलांनी केलेल्या लैंगिक छळणुकीच्या आरोपांबाबत अकबर यांनी जे स्पष्टीकरण दिले त्याच्याशी भाजपा सहमत आहे की नाही, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांना विचारला असता राव यांनी म्हटले की, सहमतीचा किंवा असहमतीचा प्रश्नच नाही, त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. आरोप करणाऱ्या महिलांविरोधात कायदेशीर लढाई देण्याचे अकबर यांनी ठरवले आहे. आपल्यावर झालेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मेहबूबा मुफ्तीना दहशतवादी मन्नान वाणीसाठी मायेचा पाझर

आफ्रिकेहून परतल्यानंतर अकबर यांनी म्हटले होते की, माझ्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मी टू वादळ का सुरू झाले. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील. दरम्यान, अकबर यांच्या वकिलांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांच्याविरोधात एक, दोन नव्हे तर १० महिलांनी आरोप केले आहेत. अकबर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांकडून सुरू आहे.

[amazon_link asins=’B07DJHV6S7,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07270732-d105-11e8-916f-cfe3a314d8cf’]