Priyank Panchal | स्थानिक क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या ‘या’ अनकॅप खेळाडूकडे रोहितने सेलिब्रेशनवेळी दिली विजयी ट्रॉफी; पाहा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Priyank Panchal | भारत आणि श्रीलंकेमधील (IND vs SL) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. दोन सामन्यांची मालिका भारतीय संघाने जिंकली असून मायदेशात सलग 15 मालिका जिंकण्याचा इतिहास (History) भारतीय संघाने (Indian Team) रचला आहे. श्रीलंकेला 2-0 ने व्हाईटवॉश भारतीय संघाने दिला आहे. या मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)  विजयी ट्रॉफी प्रियांक पांचालकडे (Priyank Panchal) दिली होती. त्यामुळे याहीवेळी युवा खेळाडूंकडे देण्याची परंपरा दिसली.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रियांकने (Priyank Panchal) अद्याप पदार्पण केलं नाही. मात्र पांचाल स्थानिक क्रिकेटमध्ये (Local Cricket) मोठं नाव असणारा खेळाडू आहे. त्याने 101 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 45 च्या सरासरीने 7068 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 24 शतके तर 26 अर्धशतके ठोकली आहेत.

 

 

भारताचा माजी कर्णधार महेंद्र धोनीने (M S Dhoni) युवा खेळाडूच्या हातात ट्रॉफी (Trophy) देणं चालू केलं होतं. त्यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) ही परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे युवा खेळाडूंचा आत्मविश्वास (Confidence) वाढण्यास मदत होते. आजच्या सामन्यानंतरचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे मात्र अनेक नेटकऱ्यांनी प्रियांकला ओळखलं नसावं.

 

दरम्यान, भारताने आजचा सामना 238 धावांनी जिंकला आहे.
या मालिकेमध्ये छाप सोडणाऱ्या ऋषभ पंतला (Rishabh Pant) मॅन ऑफ दी सीरिज
तर श्रेअस अय्यरला (Shreyas Iyer) सामनावीर (Man Of The Match) म्हणून गौरवण्यात आलं.

 

Web Title :- Priyank Panchal | ind vs sl 2nd test live updates rohit sharma hands the trophy to priyank panchal and moves aside know who is he video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेच्या आत, सक्रिय रुग्णसंख्याही घटली; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

EPFO | PF खात्यावर व्याजापासून 7 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स आणि कर्जासारख्या मिळतील अनेक सुविधा, जाणून घ्या

 

Nia Sharma Superbold Selfie | निया शर्माचा ‘हा’ सेल्फी पाहताच चाहत्यांना लागलं वेड, फोटोनं सोशल मीडियावर केला कहर