Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेच्या आत, सक्रिय रुग्णसंख्याही घटली; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून मृत्यूसंख्येतही मोठी घट होत असून आज राज्यात फक्त एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 157 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 21 हजार 220 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09 टक्के झाले आहे. राज्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 753 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 86 लाख 83 हजार 002 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 71 हजार 359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 2 हजार 382 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 18 हजार 633 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 566 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Within two hundred daily patients in the state, the number of active patients also decreased; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | PF खात्यावर व्याजापासून 7 लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स आणि कर्जासारख्या मिळतील अनेक सुविधा, जाणून घ्या

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 19 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

IND vs SL | भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश; रो’हिट’ मॅनच्या कॅप्टन्सीमध्ये केला ‘हा’ मोठा पराक्रम