Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली; जुन्या आठवणींना दिला उजाळा म्हणाली कि…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपण किती जरी भारत सोडून विदेशात राहिलो तरी शेवटी आपल्याला आपल्या घराची ओढ ही नेहमीच लागते. याचाच प्रत्यय बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री प्रियंका चोप्राला (Priyanka Chopra) देखील आल्याचे पाहायला मिळाले. तब्बल तीन वर्षांनी प्रियांका (Priyanka Chopra) भारतात परतली आहे. भारतात परतताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक फोटोज व्हिडिओज आणि स्टोरीज शेअर केले आहेत. ज्या सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत.

 

 

प्रियंका चोप्राला (Priyanka Chopra) मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पोहोचताच पापाराझींना फोटो आणि व्हिडिओ काढून तिचे कौतुक केले. तर प्रियंकानेही पापाराझींना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियंका चोप्रा ही एकटीच आढळून आली तिच्यासोबत तिचा पती निक जोनास (Nick Jonas) आणि मुलगी मालती मेरी कोणीच उपस्थित नव्हते यावेळी प्रियांका एकटीच होती. प्रियांकाने ब्लू आऊटफिट कॅरी (Blue Outfit Carry) केला होता.

 

 

लँड होताच प्रियांकाने एक स्टोरी पोस्ट केली आणि त्यावर सुंदर असे कॅप्शन देत म्हणाली, ‘अखेर परतले’. विमानतळावरून घरी जाता जाता तिने मुंबईच्या रस्त्याचे व्हिडिओ काढले आणि ‘मुंबई मेरी जान’ (Mumbai Meri Jaan) असे कॅप्शन देत तो व्हिडिओ तिने तिच्या स्टोरीला शेअर केला. एवढेच नाही तर तिने घरी जाताच आराम करत एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती टीव्ही समोर कॉफी विथ करण (Coffee With Karan) हा शो पाहताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिच्या आवडत्या वेफर्स चे फोटो शेअर केले आहे. या सगळ्यांमध्ये मात्र प्रियंका भारतात येण्याचे कारण अजून देखील समोर आलेले नाही.

 

Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra landed mumbai today shared sea link photo and other memory

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | येणार्‍या जाणार्‍यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला तरुणाने दिले पकडून; कोंढव्यातील घटना

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर