Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ होतो आहे वायरल; म्हणाली ‘मला त्या ठिकाणी जायला…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडची (Bollywood) देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात येताच तिने देशातील विविध ठिकाणी भेट दिली. प्रियंका चोप्रा ही युनिसेफची गुडविल ॲम्बेसिडर आहे (Goodwill Ambassador Of Unicef). या निमित्ताने याचाच भाग म्हणून लखनऊच्या (Lucknow) युनिसेफ ऑफिसला प्रियंकाने भेट दिली. यावेळी तिने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महिलांच्या सुरक्षेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. या दरम्यानचा एक व्हिडिओ प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

प्रियंका चोप्रा लखनऊच्या दौऱ्या मध्ये असतानाच काही वाद निर्माण झाले होते. मात्र अशा वादात देखील प्रियंका ने लखनऊचा दौरा पूर्ण केला. तिथल्या शिक्षण, आरोग्य अशा अनेक बाबतीत अशा अनेक गोष्टींचा आढावा तिने घेतला. प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याला विचारताना दिसत आहे
की, “लखनऊ मध्ये संध्याकाळी सात वाजल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची भीती वाटते”
(I Gets Scared After 7 In The Evening At Up Lucknow)
या प्रश्नावर महिला पोलीस अधिकारी तिला युपी मधील महिलांवर अत्याचार आणि लैंगिक छळाविरोधात 24 तास
सुरू असलेल्या कंट्रोल रूम मध्ये घेऊन जाते आणि तेथील मॅनेजमेंट ची संपूर्ण माहिती प्रियांकाला देते.
हा संपूर्ण व्हिडिओ प्रियंका (Priyanka Chopra) ने शेअर केला.
तर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रियांकाचा हा व्हिडिओ वायरल होताना दिसत आहे.

एवढेच नाही तर प्रियांकाने हा व्हिडिओ शेअर करत महिला आणि मुलींना एक मोठा संदेश दिला आहे.
यामध्ये तिने असे म्हटले की, “भारतात आज अजूनही अशा महिला, मुली आहेत ज्या हिंसा सहन करतात.
भीतीमुळे त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र अशा हेल्पलाइन नंबरचा वापर करून महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी.
अशा हेल्पलाइन मुळे त्यांना खूपच मदत होईल याची मला खात्री आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हा चांगला उपक्रम आहे.
यामुळे हिंसाचाराला नक्कीच आळा घातला जाईल”. यानंतर आपल्या घरी मुंबईला परतल्यावर प्रियंकाने आपली मुलगी मालतीबरोबर (Malti Chopra) क्वालिटी टाईम्स स्पेंड केला आणि तिच्याबरोबरचे फोटोही इंस्टाग्राम वर शेअर केले.

 

Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra says i gets scared after 7 in the evening at up lucknow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Mahesh Tapase | “बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी…”; राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांचा टोला

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार