Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यात एका कर्करोग रुग्णालयाचे (Cancer Hospital) उद्घाटन पार पडले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. राज्यातील सर्व प्रमुख आणि महत्वाच्या शहरांमध्ये अद्ययावत कँन्सर रुग्णालये (Cancer Hospital) उभारली गेली पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली.

राज्यातील सर्व प्रमुख आणि महत्वाच्या शहरांमध्ये अद्ययावत कर्करोग रुग्णालये उभारली गेली पाहिजेत. आम्ही देखील महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात त्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला विशेष आणि जास्तीचा निधी द्यायला हवा. तशी तडजोड केली गेली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

तसेच यावेळी त्यांना पत्रकारांनी तुम्ही एवढे दिवस कुठे होता, असा प्रश्न केला. त्यावर पवार म्हणाले, मधल्या काळात कारण नसताना माझी बदनामी केली गेली. जनमाणसांत माझी प्रतिमा मलीन केली गेली आहे. मी कुठेही पळून जाणारा माणूस नाही. मी आलेल्या संकटाला समोरा जाणारा माणूस आहे. मी कुठे होतो, का गेलो होतो, याबद्दल वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगेन. यावेळी त्यांनी या विषयावर जास्त बोलण्यास नकार दिला.

तसेच यावेळी ओल्या दुष्काळावर अजित पवार यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली.
मी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि फडणवीसांना (Devendra Fadnavis)
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. परतुं त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.
त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी दोन्हींचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्यांना तु़टपुंजी रक्कम देत आहेत.
त्यामुळे त्यांना अधिकाधिक मदत द्यावी ही सरकारकडे आमची मागणी आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title :-  Ajit Pawar | I’m not a runaway, I’m a face-to-face man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update