Priyanka Chopra Viral Photo | आई झाल्यानंतर प्रियंका चोप्रानं शेअर केला पहिला फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाली तिची ‘ही’ पोस्ट..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या अभिनयामुळं प्रेक्षकांना ज्ञात आहे. प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Viral Photo) बॉलीवूडसोबत हॉलीवुडमध्ये देखील आपले नाव कमावले आहे. तर नुकताच प्रियंकानं सरोगसीद्वारे (Priyanka Chopra Surrogacy) बाळाला जन्म दिलाय. याबद्दल तिनं काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. मात्र आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर (Priyanka Chopra Viral Photo) केली आहे.

 

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. तिनं शेअर केलेले हे फोटो (Priyanka Chopra Viral Photo) तिच्या कारमध्ये काढलेले दिसत आहे. या फोटोला 1 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच जवळपास चार हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी कमेंट मधून कौतुक केलंय.

प्रियंका चोप्रानं शेअर केलेल्या या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘द लाईट फिल्स राईट.’ तिचा हा सेल्फी बघून चाहते घायाळ झाले आहेत. तर फोटोमध्ये प्रियंका अत्यंत सुंदर दिसत आहे. तिनं हा फोटो कारमधील आरशात काढला असून, एका फोटोमध्ये तिनं गॉगल लावला आहे.

दरम्यान, प्रियंका चोप्रानं 2018 साली परदेशी गायक निक जोनास (Nick Jonas) सोबत लग्न केलं. निक तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षे लहान आहे. मात्र नुकताच त्या दोघांनी सरोगेट पालक (Surrogate Parents) झाल्याची माहिती दिली आहे.

 

Web Title :- Priyanka Chopra Viral Photo | priyanka chopra shared photos on instagram after became a mother

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा