Pro Kabaddi League | प्रो कबड्डीच्या 9व्या सिझनला आजपासून सुरुवात, दबंग दिल्ली आणि यू मुम्बामध्ये रंगणार पहिला सामना

बंगळूरु :वृत्तसंस्था – प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) नवव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि यू मुम्बामध्ये (U Mumba) रंगणार आहे. हे सामने बंगळूरु येथील कांटीरवा इनडोअर स्टेडियममध्ये (Kantirwa Indoor Stadium) खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या सीझनचे प्रो कबड्डीचे (Pro Kabaddi League) सामने बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.

 

चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील!
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीत पदक जिंकण्याची सर्वाधिक संधी असते. कोरोनाच्या काळात सर्वच खेळांचा फटका बसला, पण या काळात आम्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर भर दिला. यासह लीगच्या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळाला,’’ असे प्रो कबड्डी लीगचे (Pro Kabaddi League) आयुक्त अनुपम गोस्वामी (Pro Kabaddi League Commissioner Anupam Goswami) म्हणाले आहेत.

 

आजचे सामने
दबंग दिल्ली वि. यू मुम्बा
वेळ : सायं. 7.30 वा.

बंगळूरु बुल्स वि. तेलुगू टायटन्स
वेळ : रात्री 8.30 वा.

जयपूर पिंक पँथर्स वि. यूपी योद्धाज
वेळ : रात्री 9.30 वा.

सामन्याचे थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1,2 हिंदी

‘‘आम्ही गतविजेते आहोत आणि यंदाही चांगल्या कामगिरीचा आम्हाला विश्वास आहे.’’ असे मत यावेळी दबंग दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार (Dabang Delhi captain Naveen Kumar) याने व्यक्त केले.

 

‘‘आमच्यासाठी जेतेपद मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असून आमची दुसरी फळीही भक्कम आहे. आम्ही एकावेळी एका सामन्याचा विचार करीत आहोत. चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा असून त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे मत यू मुम्बाचा कर्णधार सुरिंदर सिंगने (U Mumba captain Surinder Singh) व्यक्त केले आहे.

 

Web Title :- Pro Kabaddi League | u mumba challenge defending champions dabang delhi ninth season pro kabaddi starts today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shanikrupa Heartcare Centre  | संकल्प निरोगी हृदयाचा..!, शनिकृपा हार्टकेअर मधील योग्य तपासणीमुळे जीवन होईल सुरक्षित

Pune Crime | लोनॲप” फसवणूक टोळीला ‘मोक्का’, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ‘मोक्का’ कारवाईचे ‘शतक’

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी