क्रिकेट सट्ट्याची वसुली करणारा पीएसआय गजाआड 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

क्रिकेट बुकीच्या नादी लागून सट्ट्यातील थकीत रक्कम वसुलीसाठी आलेल्या चंद्रपूरच्या पोलीस उपनिरीक्षकाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर चंद्रपूरातील दोन क्रिकेट बुकींनाही पोलिसांनी अटक केली. दिलीप लोखंडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे तर रितिक मेश्राम आणि रोहित गुल्हाणे अशी अटक झालेल्या बुकींची नावे आहेत.

[amazon_link asins=’B01LTHL588′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0906c493-832f-11e8-86ea-5396afe9930a’]

मेश्राम आणि गुल्हाणे चंद्रपुरात क्रिकेट सट्टा चालवितात. खामल्यातील कन्हैया करमचंदानी याच्याकडे त्यांची आयपीएलच्या सट्टयाची १ लाख २० हजारांची उधारी होती. ती देण्यासाठी करमचंदानी टाळाटाळ करीत होते. पैसे देण्यासाठी त्यांना मुदत दिली तरी ते पैसे देत नसल्याने या दोघांनी त्यांचा मित्र पोलीस उपनिरीक्षक दिलीप लोखंडे याला हाताशी धरले. भाड्याची कार करुन ते रविवारी सकाळी नागपूरला आहे. ते करमचंदानीच्या घरी पोहचले. लोखंडे चालकासह कारमध्येच काही अंतरावर थांबला. दोघे बुकी घरी गेले. इतक्या सकाळी पैसे देऊ शकत नाही. असे सांगितल्यावर त्यांनी करमचंदानीला कारजवळ आले. कारमध्ये बसलेल्या लोखंडे याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. तातडीने व्यवस्था करायला सांगितले. त्यावेळी करमचंदानी याने दोन तासाची मुदत मागून घेतली, सायंकाळ झाली तरी करमचंदानी पैसे देत नसल्याचे पाहून त्यांनी पुन्हा फोन करुन धमकाविण्यास सुरुवात केली. तेव्हा करमचंदानी याने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तातडीने सापळा रचला. करमचंदानीने फोन करून त्यांना प्रतापनगरात बोलविले आणि ते येताच पोलिसांनी त्यांना पकडले. लोखंडे याने आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला तसेच मेश्राम आणि गुल्हाणे या तिघांना अटक केली.