सुवर्णपदक जिंकलेल्या ‘या’ विद्यार्थिनीनं राष्ट्रपतींसमोर नाकारलं मेडल, ‘जाणून घ्या’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात नागरी सुधारणा कायद्यावरून वातावरण तापलेले असताना पॉण्डेचेरी विद्यापीठातील विद्यार्थिनीसोबत एक विचित्र प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते कार्यक्रमास येताच एका विद्यार्थिनीला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले.

रबीहा अब्दुरहिम असं या विद्यर्थिनीचं नाव आहे आणि ती गोल्डमेडलिस्ट आहे. याबाबत विचारणा केली असता तिचा बाहेर काढण्याचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणावरून तिला बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काही जणांना वाटले की ती मुस्लिम आहे म्हणून तिला बाहेर नेण्यात आले तर काहींना वाटले की तिने स्कर्फ घातलेला म्हणून तिला बाहेर नेण्यात आले. मात्र रबीहाने या सर्व शक्यता नाकारत तिने केवळ सीएएला विरोध केल्याने असा प्रकार घडल्याचे सांगितले.

रबीहाला राष्ट्रपती येण्याआधी बाहेर काढण्यात आले, त्यावर तिने पोलिसांना विचारले असता त्यांनाही याबाबत काही कल्पना नव्हती मात्र ज्यावेळी रबीहाला व्यासपीठावर गोल्ड मेडल घेण्यासाठी बोलावले त्यावेळी तिने प्रमुख पाहुण्यांचा आदर राखत मी हे मेडल स्वीकारू शकत नाही, सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केले गेले म्हणून मी हे मेडल स्वीकारू शकत नाही असे तिने राष्ट्रपतींना सांगितले.

चैन्नईत देखील घडला असाच प्रकार
मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या एका जर्मन विद्यार्थ्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. जेकब लिंथेडल असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठात झालेल्या सीएए विरोधातील आंदोलनात तो सहभागी झाला होता त्यामुळे त्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/