PUC Certificate | गाडीमध्ये ‘PUC’ सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  PUC Certificate | सरकारने मोटार वाहन कायद्यानूसार (Motor Vehicle Act) एक नवीन अधिसुचना जारी केली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभुमीवर हे नियम सुरू करण्यात आले आहे. या नव्या अधिसुचनेनुसार वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सोबत असणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, समजा पीयुसी सोबत (PUC Certificate) नसल्यास वाहनधारकास दहा हजारांचा दंड होऊ शकतो. तसेच सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. अशी तरतूद या नव्या नियमात करण्यात आली आहे.

 

दुचाकी असो वा कार सर्व वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र (PUC certificate) सक्तीचं करण्यात आलं आहे. हे PUC प्रमाणपत्रही वैध असले पाहिजे.
प्रमाणपत्राशिवाय किंवा कालबाह्य पीयूसीसह वाहनचालक रस्त्यावर पकडला गेल्यास त्याला दंड होऊ शकतो.
वाहतूक पोलिसांना वैध पीयूसी प्रमाणपत्र न दाखविल्यास त्याला सहा महिने कारावास किंवा 10 हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
त्याचप्रमाणे पीयूसी प्रमाणपत्र नसल्यास वाहनचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येऊ शकतो.
त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे धोकादायक ठरू शकणार आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

 

दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम (Motor Vehicle Act) 1989 नुसार, भारतातील प्रत्येक मोटार वाहनासाठी (B.S. 1, B.S. 2, B.S. 3, B.S. 4 तसेच CNG व LPG वाहने)
वैध PUC आवश्यक आहे. फोरव्हिलर बीएस 4 वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता 1 वर्षाची, तर इतर वाहनांसाठी 3 महिन्यांची आहे.

 

नेमकं PUC प्रमाणपत्र काय आहे?

 

वाहनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र (PUC Certificate) होय.
ते विशेष तपासणी केंद्रांवर बनवले जाते. यामध्ये वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वेगवेगळ्या वायूंची चाचणी केली जाते.
चाचणीनंतर वाहनास पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते.

 

PUC ला खर्च किती –

 

विविध वाहनांचे PUC प्रमाणपत्रासाठी खर्च वेगवेगळे आहे. पेट्रोल आणि सीएनजीच्या टुव्हिलर आणि 3 चाकी वाहनांसाठी प्रदूषण चाचणी शुल्क 60 रुपये आहे.
फोरव्हिलर वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र (PUC Certificate) बनवायचे असल्यास 80 रुपये शुल्क आहे. डिझेल वाहनांसाठी प्रदूषण चाचणी प्रमाणपत्राचे शुल्क 100 रुपये.

 

Web Title : PUC Certificate | if there no puc fine rs 10000 can be imposed issued new notification regarding vehicles know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली, देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले (व्हिडिओ)

Rupay New Debit Card | प्री-टीनएजर्स आणि टीनएजर्ससाठी RuPay ने लाँच केले नवीन डेबिट कार्ड, जाणून घ्या कशा असतील सुविधा

Solapur Crime | डोक्यात घाव घालून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून, सोलापूरच्या करमाळा तालुक्यात प्रचंड खळबळ