पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी

मुंबई : वृत्तसंस्था –पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात अनेक ठोस पावले उचलली जात आहे. आता पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्याची घोषणा ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे. यासंबंधी असोसिएशनने एक नोटीस जाहीर केले आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

AICWAचे जनरल सेक्रेटरी रौनक सुरेश जैन यांनी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्‍हणण्‍यात आले आहे की, अधिकृतपणे प्रतिबंध घातल्‍यानंतरदेखील जर कोणती संघटना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करेल तर त्‍यांच्‍यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) बंदी आणेल आणि त्‍यांच्‍याविरोधात असोसिएशन कठोर कारवाई करेल. तसेच या पत्रकात पुलवामा दहशतवाद्‍याची निंदा करण्‍यात आली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहिद झाले होते. आता या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतातील म्युझिक कंपन्यांनी देखील पाकिस्तानी गायकांची गाणी युट्युबवरून हटवली आहेत. तसेच अजय देवगणने देखील त्याचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like