बदल्याची वेळ आणि स्थळ जवानच ठरवतील ; त्यांना पूर्ण स्वातंत्र्य : नरेंद्र मोदी

झांसी : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पाकिस्तानला दिली आहे. इतकेच नव्हे तर, भारतीय लष्कराला प्रत्युत्तरादाखल कारवाईसाठी वेळ आणि स्थळ ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यानंतर झांसी येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चांगलंच ठणकावले पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. याचबरोबर पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पाकिस्तानला दिली आहे. इतकेच नव्हे तर, भारतीय लष्कराला प्रत्युत्तरादाखल कारवाईसाठी वेळ आणि स्थळ ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची माहितीही त्यांनी दिली.

इतकेच नव्हे तर, ”दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल”. ”जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. १३० कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.”आपला देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका, असे आवाहनही त्यानी केले.

याचबरोबर आज संपूर्ण देश दुःखी झाला आहे. तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट आहे की, मोठ-मोठ्या देशांनी पाकिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करताना अंतर राखले आहे. पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. त्याची वाईट अवस्था करण्यात आली आहे. हा भारत नवीन रीति आणि नीतिचा आहे, हे कदाचित आपला शेजारील देश विसरत आहे. दहशतवादी संघटनांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी हिंसक मानसिकता दाखवली आहे, त्याचा संपूर्ण हिशेब चुकता केला जाईल. असेही त्यांनी म्हंटले.