वर्ल्ड कपसाठी कॅप्टन कोहलीला ‘PUMA’ कडून खास गिफ्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ देखील या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. सर्वच संघानी यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत विजयासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्यूमा (PUMA) कंपनीने स्पेशल गिफ्ट दिले आहे. प्यूमा या प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडद्वारे स्पेशल एडिशन बुट डिझाईन करण्यात आले आहेत. जगात केवळ या प्रकारचे फक्त १५० बुट उपलब्ध आहेत.

https://twitter.com/imVkohli/status/113079064588541542

यावेळी विराटने ट्विटरवर या शूजविषयीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करत त्याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे कि, माझ्या वर्ल्ड कपचे बुट तयार आहे. सोनेरी रंगाची स्पाईक आणि पांढऱ्या रंगाचे शूज घालून वर्ल्ड कपच्या मैदानात उतरण्यासाठी मी फार उत्सुक आहे. अशाप्रकारचे शूज बनवल्यामुळे मी प्यूमा परिवाराचा फार आभारी आहे. प्यूमा कंपनीने पहिल्यांदाच अशाप्रकारचे गोल्ड शूज तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे शूज वर्ल्ड कपसाठी स्पेशल तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्यूमाने भारतात आणि जगभरात याप्रकारचे केवळ १५० शूज बनवले आहेत.

काय खास आहे या बुटांमधे
या शूजचे नाव वन-८ असे आहे. हे बुट पांढऱ्या रंगाचे असून त्याला गोल्डन रंगाची स्पाईक देण्यात आली आहे. हे प्यूमा कंपनीचे स्पेशल एडिशन बुट आहेत. याचे फक्त १५० जोड बनवण्यात येणार आहे. त्यामुळे हे बुट जगभरातील केवळ १५० लोकांकडेच असणार आहे. या बुटांची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. दरम्यान, या स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होणार असून, भारत आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळेल.