पुण्यातील महर्षीनगर येथे क्रेनच्या धडकेत 2 मुले जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महर्षीनगर चौकीजवळ भरधाव क्रेनची धडक बसून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.

आयुष आवळे (वय आठ) आणि आयुष सुरेश सोनी (वय आठ, रा. गुलटेकडी) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी आयुषचे वडील विनोद आवळे (वय ३८, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्रेन चालक सदाशिव बाबुराव भांडवलकर (रा. महर्षीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष व त्याचा मित्र हे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महर्षीनगर चौकीजवळून जात होते. त्यावेळी भरधाव क्रेनची त्यांना धडक बसल्यामुळे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेन चालकास अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

You might also like