शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच, येरवड्यात 3 दुकाने फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी एकाच रात्रीत येरवडा येथील तीन दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी विजयराज चौधरी (वय 30, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर परिसरातील हरमेश हेरीटेज ही बहुमजली इमारत आहे. त्यात विविध व्यवसायिक दुकाने आहेत. नेहमी प्रमाणे शनिवारी संध्याकाळी व्यवसायिकांनी दुकाने बंद केली. यानंतर चोरट्यांनी ओम मेडीकलचे शटर उचकटून 6 हजारांची रोकड चोरली. त्यानंतर ओम सुपर मार्केट दुकानातील पाच हजार आणि मिठास दुकानातून चार हजार मिळून 15 हजारांची रोकड चोरुन नेली. हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक शांतमल कोलुरे करत आहेत.