Pune : चतुःश्रंगी आणि कोंढव्यात घरफोडीच्या 3 घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडत किंमती ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. चतु:शृंगी आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ईश्वर राम (वय 23) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बाणेर भागात म्हाळुंगे रोडवर जगदंबा ट्रेडर्स हे दुकान आहे. दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी शंटर उचकटून आता प्रवेश केला. तसेच, दुकानातून 10 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. तर दुसरा प्रकार हा कोंढवा येथे घडला असून, यात दोन ठिकाणी बंद फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत 56 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. फिर्यादी या शितळा देवी पेट्रोल पंप परिसरात मयूर पंख सोसायटीत राहतात. दरम्यान मध्यरात्री चोरटे त्यांच्या जिनाच्या टेरेसवर चढून दरवाजा वाटे आत शिरले आणि त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या शेजारी रहाणारे एक व्यक्तिच्या घरात शिरून 2 हजार रुपयांचे पाण्याचे नळ चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.