Pune : मुंढव्यात 27 वर्षीय महिलेचे कपडे फाडून विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यरात्री कामावरून घरी जाणाऱ्या महिलेचा एका अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्यानंतर भिती पोटी महिला घाईत गाडी चालवताना पडल्याची घटना मुंढव्यात घडली आहे. महिला गाडीवरून पडल्यानंतर त्या आरोपीने कपडे फाडून विनयभंग केला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर मध्यरात्री हा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला मुंढवा परिसरात राहते. त्या जॉब करतात. दरम्यान त्या जॉब सुटल्यानंतर पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. यावेळी एकाने त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करण्यास सुरुवात केली.

तो पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत आला. यामुळे त्या घाबरून गेल्या. त्या घराजवळ आल्यानंतर तिचे असलेल्या स्पीड ब्रेकरवर त्या घाईत जात असताना घसरून खाली पडल्या. त्यानंतर त्या आरोपीने फिर्यादी यांचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाला. यानंतर त्या खूपच घाबरलेल्या अवस्थेत सोसायटीच्या आत शिरल्या आणि कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.