Pune : सामाजिक भावनेतून गरजूंना धान्यरूपी मदतीचा हात- अमृत पठारे

पुणे – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे कष्टकरी कामगारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे दाम नाही, अशी अवस्था झाली आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक, शिवअंगणवाडी जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी 200 गरजू कुटुंबांना धान्याचे कीट दिले.

याप्रसंगी सविता देवकर, सुजाता देशमुख, श्वेता घाडगे, विजया टिट्टा, सुनीता भोळे, रत्नमाला अय्यर आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.

अमृत पठारे म्हणाल्या की, शिवअंगणवाडी सेनेच्या अध्यक्षा सारीका सावंत, रंजना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयातही उपचारासाठी बेड मिळत नसल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यांना वेळेत उपचार झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सामाजिक बांधिलकी जपत खराडी, काळुबाईनगर, थिटेवस्ती येथील गरजू येथे 200 कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेना सामान्य नागरिकांना नेहमीच आधार ठरत आहे. त्यामुळे खराडील वंचितांसाठी 6 महिने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देऊन चांगले काम केले आहे, अशी भावना येथील महिलावर्गानी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.