MNS Chief Raj Thackeray | ‘तर मी घरात बसेन पण…’, राज ठाकरेंचे सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य

चिपळून : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर (Ratnagiri Tour) आहेत. यामध्ये चिपळून येथे कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदाधिकाऱ्यांना पदावर राहता येणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर (Maharashtra Politics News) बोलताना राज ठाकरे म्हणाले, येत्या 15 दिवसात मी विविध ठिकाणी मेळावे घेणार आहे. त्यामधून माझी भूमिका स्पष्ट करेन. राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

पार्ट्यांसाठी निवडणूक लढवायची का?

लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) का लढवायची? दारु, मटण, पार्ट्या यासाठी निवडणुका लढवायच्या का? अशा शब्दात राज ठाकरे  यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फटकारले. राज ठाकरे पुढे म्हणाले, शाखा नाही तर नाका उभा करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्रावर प्रेम कमी होऊ देऊ नका, तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका, राज्यासाठी लढा, राज्यातल्या नागरिकांवर प्रेम करा. पक्ष नव्हे तर कुटुंब म्हणून काम करा. काम करणार नसाल तर दुसरी माणसं येतील. मनसेचा आमदार, खासदार व्हायला हवा असंही राज ठाकरे यांनी म्हटले.

 

 

चिपळूनमध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
चिपळून नंतर राज ठाकरे खेड आणि दापोलीला जाणार आहेत.
पक्ष बांधणीनिमित्त राज ठाकरे यांनी कोकण दौरा आखला आहे.
यावेळी चिपळूनमध्ये येताच राज ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखेचं उद्घाटनही करण्यात आले.

 

Web Title : MNS Chief Raj Thackeray | mns-chief-raj-thackeray-in-ratnagiri-ask-party-workers-why-we-are-contesting-election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा