Maharashtra Political Crisis | अर्थखात्याचा पेच सुटेना, अंबादास दानवेंनी सुचवला मार्ग; म्हणाले – ‘अजित पवारांना मुख्यमंत्रीपद घ्यावे आणि…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंड करुन सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. (Maharashtra Political Crisis) त्यातच अजित पवार यांनी अर्थखात्यावर (Finance Minister) दावा केल्या असून, त्याला शिंदे गटाच्या आमदारांचा (Shinde Group MLA) तीव्र विरोध आहे. यावर तोडगा निघत नसल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावत पर्याय सुचवला आहे.

 

अर्थ खात्यावरुन चाललेल्या गोंधळावरुन अजित पवार यांना मुख्यमंत्री पद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देऊन हा तिढा सोडवावा, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Political Crisis) तसेच दानवे यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Maharashtra Cabinet Expansion) सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने (BJP) युती करण्यासाठी शिवसेना (Shivsena) आणि आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे ते आता त्यांना काम करुन देणार का? असा सवाल दानवे यांनी विचारला आहे.

 

अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका

मंत्रीपद गळ्यात पडले या आशेने डोळे लावून बसलेल्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, असे चित्र सध्या बघायला मिळत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. जे सोबत आले आहेत त्यांना सरकार न्याय देऊ शकले नाही मग अपक्षाला न्याय देणं तर लांबच आहे. अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते. मात्र आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवारांना दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर केली.

 

आमदार बच्चू कडू वर टीकास्त्र

आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांच्यावर टीका करताना दानवे म्हणाले,
मंत्रीपद त्याग केलं अशी भूमिका आज बच्चू कडू यांनी मांडली.
शिंदे फडणवीस मंत्रिपद घ्या म्हणून मागे लागलेत का?, ते देत नाही.
मग त्याग कस करताय? या सर्व बनावट गोष्टी असल्याचे दानवे म्हणाले.
तर आरएसएस चं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राने ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी
उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनात गंगेत वाहिलेल्या प्रेतांबाबत जाब विचारावा. पंतप्रधान फंडाबाबत प्रश्न विचारावेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

 

 

Web Title : Maharashtra Political Crisis | make-eknath-shinde-finance-minister-ambadas-danve-advice-to-ruling-party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा