Pune Crime News | पुण्यातील कलवड वस्तीत 25 वाहनांची तोडफोड, तीन आरोपी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका तरुणाने धुमाकूळ घालत 25 वाहनांची कोयत्याने (Koyta) तोडफोड केली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि.6) मध्यरात्री बडी मस्जिद गल्ली ते दत्त मंदीर चौक व दत्त मंदिर चौक ते खेसे पार्क रोडवर घडली. आरोपींनी रोडवर पार्क केलेल्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी गाड्यांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

हाशिम खलील शेख (वय-18 रा. लेन नंबर.2, विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) याला अटक केली आहे. तर त्याच्या दोन अल्पयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे (Sr PI Anandrao Khobare) यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना माहिती मिळाली की, रात्री कलवड वस्तीमध्ये वाहनांची तोडफोड करणारे आरोपी कलवड वस्ती येथील मोकळ्या मैदानातील झुडपांमध्ये लपुन बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता, एक सत्तुर व एक दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे (PSI Ravindra Kumar Warangule) करीत आहेत. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील
(ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे,
पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी (PI Sangeeta Mali), सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan),
पोलीस अंमलदार उमेश धेंडे, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, सचिन जाधव, शैलेश नाईक,
ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार

Pimpri PCMC News | पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे कुणबी जात प्रमाणपत्राच्या कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती