Pune ACB Trap Case | लाच घेताना दौंड नगरपरिषदेतील दोन अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap Case | प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाच्या उर्वरित रकमेचा चेक काढण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारताना दौंड नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana Pune) अभियंता व प्रकल्प सल्लागार अभियंता यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Daund ACB Trap Case). एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.18) दौंड नगरपरिषदेच्या (Daund Nagar Parishad Office) कार्यालयामध्ये केली. (Pune ACB Trap Case)

प्रधानमंत्री आवास योजना अभियंता विजय दिगंबर नाळे Vijay Digambar Nale (वय 27), प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप Prashant Madhukar Jagtap (वय -31) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन अभियंत्यांची नावे आहेत. याबाबत 52 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. (Pune ACB Trap Case)

तक्रारदार यांच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाची उर्वरित रकमेचा चेक काढण्यासाठी यातील प्रधानमंत्री आवास योजनेचा अभियंता विजय नाळे यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता विजय नाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच
मागून तडजोडी अंती 30 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यातील ऍडव्हान्स म्हणून 10 हजार रुपये लाच स्वीकारली आहे.
तसेच यातील प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप यांनी नाळे यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने,
पोलीस अंमलदार रियाज शेख, सुरडकर, माने, चालक जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | 25 हजाराची लाच घेताना पुण्यातील सहायक फौजदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

ACB Trap News | पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात