Pune ACB Trap News | दीड लाखाच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघांना पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल न करण्यासाठी दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (Assistant Police Inspector (API) एका पोलिस कर्मचार्‍याला आणि एका खाजगी व्यक्तीस दि. 20 जून 2023 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने (Pune Shivaji Nagar Court) दिला आहे. (Pune ACB Trap News)

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे (API Amol Prakash Korde), पोलिस अंमलदार सागर तुकाराम शेळके (Police Sagar Tukaram Shelke) आणि खाजगी व्यक्ती सुदेश शिवाजी नवले Sudesh Shivaji Navale (43, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या ओळखीच्या एकाला बँकेतून लोन काढून आणि स्वतःजवळील काही रक्कम दिली होती. बँकेचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या ओळखीच्याकडे पैशाची मागणी केली Anti Corruption Bureau Pune (Pune ACB). त्यावेळी त्याने तक्रारदाराविरूध्द निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता. (Pune ACB Trap News)

 

तक्रार अर्जाची चौकशी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल प्रशाक कोरडे करीत होते. एपीआय कोरडे, पोलिस अंमलदार सागर शेळके यांनी तक्रारदारावर खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांच्याकडे दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. दोघांनी मध्यस्थ सुदेश नवले याच्याकरवी तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तिघांना शनिवारी अटक केली होती. (Pune Bribe Case)

तिघांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी तिघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.
विशेष न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकुन तिघांना दि. 20 जून पर्यंत
पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Pimpri Chinchwad ACB Trap)

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (DySP Shital Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale), पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar), पोलिस हवालदार नवनाथ वाळके, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, महिला पोलिस अंमलदार शिल्पा तुपे आणि चालक पोलिस अंमलदार पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. (Pimpri Chinchwad Bribe Case News)

 

Web Title : Pune ACB Trap News | API Amol Prakash Korde Police Sagar Tukaram Shelke Sudesh Shivaji Navale Send In PCR Upto 20 june In Bribe Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातून गांजा विक्री करिता पुण्यात आलेल्या 3 उच्चशिक्षित तरूणांना गुन्हे शाखेच्या
अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून अटक; 12 लाखाचा माल जप्त

Devendra Fadnavis | ‘मोदी वाघाप्रमाणे, जंगलातील कितीही जनावरे…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Ashish Deshmukh | फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थिती आशिष देशमुखांचा भाजपात प्रवेश, फडणवीसांना दिला ‘हा’ शब्द (व्हिडिओ)

MNS Chief Raj Thackeray | दुसऱ्या जातीचा द्वेष करणाऱ्या लोकांवर राज ठाकरेंचा शाब्दिक प्रहार, म्हणाले- ‘स्वत:च्या जातीबद्दल…’